ग्रंथ
(ग्रंथ पाहण्यासाठी ग्रंथाच्या शीर्षकावर क्लिक अथवा टच करा.)
भारतीय मुसलमान : वर्तमान आणि भविष्य या अनुवादित वैचारिक ग्रंथातून भारतीय मुस्लिमांच्या धार्मिक, सामाजिक, आर्थिक, वैचारिक परिस्थितीचा विचार साकल्याने मांडला आहे. या ग्रंथामध्ये हंस या हिंदी पाक्षिकामध्ये प्रकाशित झालेल्या विविध मान्यवरांच्या पंधरा लेखांचा अनुवाद आहे. या लेखनाचे वैशिष्ट्य असे आहे की, भारतातील मान्यवर मुस्लीम विचारवंतांनी मुस्लीम समाजाची मांडलेली वस्तुस्थिती मराठी भाषिकांना उपलब्ध झाली आहे. भारतीय मुसलमान समजून घेण्यामध्ये अजूनही मोठ्या समूहाला फारसे यश आलेले नाही. अशावेळी भारतीय मुसलमान : वर्तमान आणि भविष्य हा ग्रंथ संशोधक, अभ्यासकांसह सर्वसामान्य माणसांनाही उपयुक्त ठरेल.
भारतीय
मुसलमान : वर्तमान आणि भविष्य या अनुवादित वैचारिक ग्रंथाचा समीक्षात्मक अंगाने विचार
करण्यात आला आहे.
मराठी साहित्यात अनुवादित आत्मचरित्रांचे बहुमोल योगदान आहे. विशेषत: भारतीय स्तरावर नावलौकिक प्राप्त असणार्या विविध क्षेत्रातील मुस्लिमांच्या आत्मचरित्रांचे हे दालन समृद्ध केलेले आहे. प्रस्तुत स्पंदन या ग्रंथामध्ये महाराष्ट्राबाहेरील मुस्लीम लेखकांच्या आत्मचरित्रांचा समीक्षात्मक विचार मांडला आहे. यामुळे भारतीय स्तरावर आणि विशेषत: कन्याकुमारी पासून ते जम्मू-काश्मीर पर्यंत भारतात असणारा मुस्लीम समाज, या समाजाची धारणा, जीवन, भाषा याचा परिचय होण्यास मदत होते. भारतीय मुस्लीम समाजाचे विविधांगी स्वरूप समजून घेण्यात स्पंदनमुळे निश्चितच मदत होते.
'डॉ. नरेंद्र दाभोलकर : व्यक्ति आणि विचार या ग्रंथामध्ये डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या उपलब्ध ग्रंथांच्या अनुषंगाने समीक्षात्मक मांडणी केली आहे. ही मांडणी करीत असताना डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या अंधश्रद्धाविषयक विविधांगी विचारांची ओळख संकलीत रूपाने व्हावी असा हेतू आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निधनानंतर त्यांच्या लेखनाच्या अनुषंगाने झालेली ही पहिली मांडणी आहे.
'डॉ. नरेंद्र दाभोलकर : व्यक्ति आणि विचार या ग्रंथाचा समीक्षात्मक अंगाने विचार करण्यात आला आहे.
Very nice, Congratulations sir
ReplyDelete