विशेष सुचना : ब्लॉगवरील ध्वनिफिती, चित्रफिती, संशोधन लेख, ग्रंथ, छायाचित्रे व इतर लेखन साहित्याबाबत आपला अभिप्राय ब्लॉगच्या Comment बॉक्समध्ये टाईप करून कळवावा.
नमस्कार,
मी प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण (श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय, कोल्हापूर) या ब्लॉगच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधू इच्छितो. आधुनिक काळात माहिती तंत्रज्ञानाचे क्षेत्र खूप झपाट्याने बदलत आहे. व्यक्ति समोरासमोर बोलताना जितके मोकळी होत नाही त्यापेक्षाही अधिक ती आपल्या लेखनातून व्यक्त होते. मलाही असेही सतत वाटत राहिले की, आपण ज्या वेगवेगळ्या विषयांच्या संदर्भात चिंतन, मनन केले आहे त्या सर्व विषयांची मांडणी ब्लॉगच्या माध्यमातून करावी. माझा हा प्रयत्न मी केलेल्या संशोधनात्मक कामापुरताच मर्यादित आहे. या निमित्ताने अनेक जाणकार व्यक्तींपर्यंत पोहचता येईल याचा मला विश्वास आहे. या ब्लॉगच्या माध्यमातून मी लिहिलेली पुस्तके, वेगवेगळ्या विषयांवर लिहिलेले लेख, ऑडिओ, व्हिडीओ व त्याचबरोबर फोटोंच्या माध्यमातून काही महत्त्वाच्या क्षणांची उजळणी करण्याचा हेतू आहे. माझ्या या प्रयत्नांना आपल्याकडून निश्चितपणे प्रतिसाद मिळेल अशी मला आशा आहे.
धन्यवाद!
Research Articles :
या पृष्ठामध्ये माझे विविध नियतकालिके, आंतरराष्ट्रीय-राष्ट्रीय पातळीवरील चर्चासत्रात मांडलेले संशोधन लेख दिले आहेत.
Books :
या
पृष्ठामध्ये माझे प्रकाशित झालेले
ग्रंथ PDF स्वरुपात दिले आहेत.
Videos :
या
पृष्ठामध्ये मी दिलेल्या
व्याख्यानांच्या चित्रफिती या ठिकाणी अपलोड केल्या आहेत.
Audios :
या
पृष्ठामध्ये माझ्या
व्याख्यानांच्या काही ध्वनीफिती अपलोड केल्या आहेत.
Photos :
या
पृष्ठामध्ये माझ्या एकूण
प्रवासातील काही निवडक आठवणींचे फोटो
याठिकाणी आपण पाहू शकता.
मित्रानो.... हा माझा एक नवीन उपक्रम आहे. बदलणाऱ्या काळाबरोबर आपलाही
प्रवास असावा असा माझा कयास नेहमी राहिला आहे. हा ब्लॉग म्हणजे त्या उपक्रमाचा एक भाग
होय.